R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. घुले यांनी राजकीय एजंटच्या त्रासाला कंटाळून केला...

वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. घुले यांनी राजकीय एजंटच्या त्रासाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न.

ठाणे | आपला दवाखाना या योजेनच्या माध्यमातून गरजू आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे वने रुपी क्लीनिकचे सर्वेसर्वा डॉ राहुल घुले यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी काळ झोपेच्या ३० गोळ्या एकत्र घेऊन आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या आपली प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून राजकीय एजंट पैशांची मागणी करीत असून, आपल्या जिवाला धोका असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचेही ट्वीट त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू केला आहे. हे काम मेडिंगो या कंपनीला दिले होते; परंतु हे काम झेपत नसल्याने त्यांनी वन रुपी क्लिनिकचे राहुल घुले यांच्या मदतीने ठाण्यात २५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला.

सहा महिने उलटूनही केलेल्या कामाचे बिल अदा न झाल्याने काही दिवसांपूर्वीच घुले यांनी दवाखान्याचे शटर डाऊन करून ट्वीटद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. आता २२ जून रोजी रात्री त्यांनी पुन्हा ट्वीट करून राजकीय एजंट आपल्याकडून वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले, तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी काही एजंटची नावेदेखील जाहीर केली. त्यामुळे या ट्वीटमुळे एकचं खळबळ उडाली आहे.

loknews24tass

Author: loknews24tass

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments