R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ममता बॅनर्जी यांनी आता भारतासाठी लढायचंय,प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी मांडले मत

ममता बॅनर्जी यांनी आता भारतासाठी लढायचंय,प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी मांडले मत

 

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. मागच्या दोन दिवसांपासून ममता बॅनर्जी ह्या नवी दिल्लीत असून यावेळी त्यांनी अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

यावेळी प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आजमी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान ममतांनी जावेद अख्तर यांना तृणमूल काँग्रेसचे स्लोगन ‘खेला होबे’वर गाणे लिहिण्याची विनंती केली. ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.

ममतांच्या भेटीनंतर जावेद अख्तर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला इतरांचं माहीत नाही, पण माझ्या मते देशात परिवर्तन व्हायलाच हवं. देश सध्या तणावाखाली जगतोय, ध्रुवीकरणाच्या मुद्यावर अनेकजण आक्षेपार्ह विधानं करतायत. देशात ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडतात, दिल्लीतील दंगली याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. या गोष्टी व्हायला नको होत्या,

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, बंगालला मोठा इतिहास आहे. त्या राज्याने नेहमीच क्रांतीकारी आंदोलनाचांचे नेतृत्व केलंय. बंगालचे कलाकार आणि बौद्धिक लोक ममतांना पाठिंबा देतात त्या परिवर्तनामध्ये विश्वास करतात. आधी त्या बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढायचं आहे. मुळात नेतृत्व कोण करेल, हा मुद्दा नसून तुम्हाला कसा भारत हवा आहे, हा प्रमुख मुद्दा आहे, असेही अख्तर म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments