R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खासदार संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या भेटीला !

खासदार संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या भेटीला !

 

नवी दिल्ली | खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नवनिर्वाचित केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीत छत्रपती खासदार संभाजी राजेंनी रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगडावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली.

रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्त्व विभागाला २०१८ साली ११ कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. त्यापैकी पुरातत्त्व विभागाने गेल्या साडे तीन वर्षांत केवळ ६० लाख रूपयांचीच कामे केलेली आहेत. तर उर्वरीत निधी तसाच पडून आहे.

मात्र आद्यपही भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्खनन व जतन संवर्धनाची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत. केवळ सहाच ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे. इतर वाड्यांच्या उत्खननाची कामे हाती घेतलेली नाहीत. तरी, या कामांना गती देऊन निश्चित वेळेत ती पूर्ण करावीत, याबाबत संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे.

रायगडावरील हत्ती तलाव आणि इतर पाणवठे, महादरवाजा तटबंदी, नाणे दरवाजा यांचं जतन आणि संवर्धनाची कामे मागील चार वर्षांत प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. तसेच फरसबंद, पायरीमार्ग, स्वच्छतागृहे, भूमिगत विद्युत वाहिन्या अशी विकासात्मक कामेदेखील प्राधिकरणामार्फत सुरू आहेत, याबाबत मंत्री रेड्डी यांना संभाजीराजे यांनी सविस्तर माहिती दिली.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments