R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पूरग्रस्तांच्या मदतीत भाजपा कमी पडणार नाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पूरग्रस्तांच्या मदतीत भाजपा कमी पडणार नाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भारतीय जनता पार्टीकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागातून २० ते २५ ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागात पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजपा कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते श्री. कृपाशंकर सिंग यांच्या तर्फे पूरग्रस्तांसाठीचे मदत साहित्य रवाना करण्यात आले. या प्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, पूरग्रस्त भागासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भाजपा कार्यकर्ते पुरग्रस्तांच्या मदतीत काहीही कमी पडू देणार नाहीत.

कृपाशंकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे मदत साहित्य पाठविले आहे. भांडी कुंडी, अन्न पदार्थ , चटया, कपडे, पिण्याचे पाणी याबरोबरच सायकलीही पाठवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी आमदार अतुल शाह, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पाण्डेय आदी उपस्थित होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments