R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही पण... मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचे प्रतिउत्तर !

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही पण… मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचे प्रतिउत्तर !

 

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच चवताळले आहेत. राज्यातील शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. आता या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुंबईत माहीम येथे भाजपा कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमात बोलताना प्रसाद लाड यांनी एक सेनाभवन तोडफोड करण्याचे वक्तव्य केलं. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेना भवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं प्रसाद लाड म्हणाले. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल असे विधान त्यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments