R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रसाद लाड, नीतेश राणे सारखे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागले -...

प्रसाद लाड, नीतेश राणे सारखे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागले – विनायक राऊत

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र शिवसेना पक्षावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तसेच तात्यांच्या या टीकेला शिवसैनिक सुद्धा सडेतोड उत्तर देताना दिसून येतात. त्यातच आता राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

अवैध संपत्ती जमा केल्याप्रकरणी ईडीने कारवाई करू नये म्हणून घाबरलेल्या नारायण राणे, नीतेश आणि नीलेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावे आणि मग शिवसेनेवर टीका करावी. तुमची ओळखच शिवसेनेतून निर्माण झालेली आहे आणि तुमची जीभ हसडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना भवनावर चाल करण्याची जी काही कोल्हेकुई करतात त्यांना त्या ठिकाणी गाडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, मुंबईकरांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेना भवनाला भाजपाचा बालेकिल्ला बनवणे स्वप्नातही शक्य होणार नाही, आयुष्यात तर नाहीच. भविष्यात त्यांचे कणकवलीमध्येच विसर्जन करण्याचा निर्धार आमच्या शिवसैनिकांनी केला आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची भाजपा राहिलेली नाही. तर प्रसाद लाड, नीतेश राणे सारख्या भांडग्यांची भाजपा झालेली आहे, हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनीच त्यांची तोंडे बंद केली तर त्यांचा भविष्यकाळ आहे अन्यथा या भांडग्यांसंगे भाजपासुद्धा संपून जाईल असे विनायक राऊत म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments