R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज करणार पूरग्रस्त सांगलीची पाहणी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज करणार पूरग्रस्त सांगलीची पाहणी !

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे तेथील स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरबाधित जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.

पूरग्रस्त कोकण आणि कोल्हापूरची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. यावेळी ते सांगलीतील पूरग्रस्तांची भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्यांची माहिती घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी ९ वाजता विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत. तेथून मोटारीने ते १०.५५ वाजता भिलवडी, ता. पलूस येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अंकलखेप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्वीन पूल, हरभेट रोड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सांगलीत पोहोचून दुपारी १ वाजता प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार असून तिथून कोल्हापूरकडे रवाना होऊन विमानाने ते मुंबईत पोहोचणार आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments