R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "महापालिका राखी तो कमिशन चाखी" सरकार राखी तो वसुली चाखी" मनसेचा जोरदार...

“महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी” मनसेचा जोरदार टोला

 

मुंबई | एकीकडे भाजपने सुद्धा मुंबई मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलेली असताना दुसरीकडे मनसे सुद्धा रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई मानपामध्ये सुरु असलेल्या भ्रष्ट्राचारावर टीका केली आहे. देशपांडे यांनी कोविड सेंटरच्या कारभारावरुनही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडूनही तयारी सुरू असून महापालिकांच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे.

पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या कारभारावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत कमिशन आणि वसुली तसेच पुण्याती फुकट बिर्याणीवरुन महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत नव्या म्हणींसाठी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “पाहिले एकच म्हण होती” तळे राखी तो पाणी चाखी”या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय”शहर राखी तो बिर्याणी चाखी” “महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी”मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी” अशी खोचक टीका केली आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments