R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची महत्वपूर्ण माहिती वाचा !

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची महत्वपूर्ण माहिती वाचा !

 

पुणे | बंजारा समजाची तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता पुणे पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील धक्कदायक माहिती पुढे आली आहे. पूजा चव्हाण आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

सदर तरुणीनं आत्महत्या करण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी पूजा आणि राठोड यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यामध्ये झालेले संवाद तरुणीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यातला एक संवाद ९० मिनिटांचा आहे. पूजाने ७ फेब्रुवारीला पुण्यातील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

‘तरुणीच्या मोबाईलमधून काही पुरावे हाती लागले आहेत. तरुणीशी संभाषण झालेली व्यक्ती राठोड असल्याचं समजतं. तिनं सर्व संभाषणं रेकॉर्ड केली आहेत. बंजारा भाषेत ही संभाषणं झाली आहेत. त्याचं भाषांतर करण्याचं काम सुरू आहे,’ अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. या संदर्भाती आद्यपही राठोड यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments