R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? उद्धव ठाकरे...

संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर टीका !

 

 

सांगली | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे तेथील स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरबाधित जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. पूरग्रस्त कोकण आणि कोल्हापूरची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. तसेच तात्यांच्यांशी संवाद साधत आहे. त्यांच्या समस्यांची माहिती घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. यावेळी संवाद साधताना पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे.

संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडीकरांना दिली.

कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments