R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड राज कुंद्राला का अटक केली, या मगच सरकारी वकिलाने सांगितलं कारण |

राज कुंद्राला का अटक केली, या मगच सरकारी वकिलाने सांगितलं कारण |

 

पॉर्नफ्लीम प्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पुढे या प्रकरणात अनेक खुलासे झालेले आढळून आले होते. तसेच त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची सुद्धा चौकशी करण्यात अली होती. तसेच य दोघांचे बँकखाते सुद्धा चौकशीसाठी सील करण्यात आले होते. त्यातच आता कुंद्राला पोलिसांनी का अटक केली या संदर्भातील कारण सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.

राज कुंद्रा यांच्याकडे चौकशी सुरूअसताना कुंद्राने पोलिसांना तपासात सहाय्य करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स, चॅट्स डिलीट करायला सुरुवात केली. पुरावे नष्ट करण्यासाठी ते धडपडत होता. आरोपी जेव्हा पुरावे नष्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा तपास यंत्रणा मूक साक्षीदार बनून राहू शकत नाही.

मात्र आरोपींना तसं करण्यापासून प्रतिबंध करणं अत्यावश्यक असतं. म्हणूनच आरोपींच्या कृतींना प्रतिबंध करण्यासाठी त्यांना पोलिसांनी अटक केली, असं स्पष्टीकरण अरुणा पै यांनी मुंबई हायकोर्टात दिलं. राज मुद्रा याने पर्सनल लॅपटॉप, मोबाईल फोन आणि स्टोरेज एरिया नेटवर्क डिव्हाइसमधूनही आणखी काही फाइल्स जप्त करण्यात आल्या आहे अशी माहितीही अरुणा पै यांनी दिली.

पोलिस आपलं म्हणणं सादर करतील, अशी माहिती पै यांनी दिल्यानंतर न्या. ए. एस. गडकरी यांच्या पीठाने हा खटला पुढील सुनावणीपर्यंत स्थगित केला. कुंद्रा यांना अटक केल्यानंतर त्यांनी आपले वकील अबद पोंडा यांच्या माध्यमातून कोर्टात धाव घेतली. त्यांच्या वकिलांनी अटकेबाबत मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments