R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यातही बदलाची आवश्यकता - उध्दव ठाकरे

बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यातही बदलाची आवश्यकता – उध्दव ठाकरे

 

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनसाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम याबाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेवूनच विकास कामे केली जातील. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

२०१९ चा महापूर, कोरोना आणि आता २०२१ चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर आता अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण तरीही पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणे, यासाठी शासन कटीबध्द आहे. सर्व बाबींचा समतोल राखत जनतेच्या सहभागाने आपण या संकटावरही मात करु, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

निसर्गाची मर्जी राखली नाही. तर मोठे फटके बसत आहेत. याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले, वारंवार येणारे संकट पाहता आतापर्यंत विकास करताना काही उणीवा राहिल्या असल्यास कठोरतेने नियमांची अंमलबजावणी करा, ब्ल्यु लाईन, रेड लाईन अशा रेषा किती दिवस काढायच्या ? त्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे. ज्या वस्त्यांमध्ये पाणी वाढत आहे. त्याचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.

पुराचे व्यवस्थापन सुनियोजितपणे करणे आवश्यक असल्याचे सांगून, सांगली शहरातील शेरी नाल्याचे पाणी अन्यत्र वळविता येईल का ? यासाठीही विचार व्हावा. आम्ही केवळ परिस्थिती एैकली आहे. पण सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व पुरगस्त विविध जिल्ह्यातील लोकांनी ही बिकट स्थिती अनुभवली व भोगली आहे. विचित्र पध्दतीने पावसाचा पॅटर्न बदलत असून त्यातून कोणीच सुटत नाही. याचा विचार करुन बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यातही बदलाची आवश्यकता अधोरेखित केली.

महापुरासारख्या आपत्ती टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा केवळ तज्ज्ञांची समिती नेमली जाते पण अहवालाची अंमलबजावणी होत नाही. तसे यावेळी न करता आतापर्यंतच्या विविध समित्यांनी केलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेला विश्वासात घ्यावे, आता जो आराखडा तयार करु त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, जनता आणि लोकप्रतिनिधी या सर्वच घटकांचा सहभाग अत्यावश्यक आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments