R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश गळफास घेणाऱ्या सख्या बहिणींचे आत्महत्येचे कारण आले समोर वाचा !

गळफास घेणाऱ्या सख्या बहिणींचे आत्महत्येचे कारण आले समोर वाचा !

 

नवी मुंबई | नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सोसायटीमध्ये राहणार्‍या दोघा सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र आत्महत्येचे कारण पुढे आले नव्हते. त्यामुळे पोलीस अधिक तपस करत होते.

मात्र आता या आत्महत्येचे कारण पुढे आले असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले प्राथमिक तपासात पुढे येत आहे. या दोन्ही बहिणी सुशिक्षित असून त्या लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. मात्र, गेल्या वर्षभरापासून क्लासेस बंद असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी आल्या होत्या.

दोन्ही बहिणींच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून १० वर्षापूर्वी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. सोसायटीतील इतरांशी यांचा फारसा संपर्क नसायचा. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. दोघी बाहेर कोणाला दिसल्या नाही. त्यात घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजारी राहणार्‍या लोकांनी दरवाजा वाजविला,
परंतु, आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी माजी नगरसेवक विजय चौगुले, मामित चौगुले यांना याची माहिती दिली. त्यानंतर चौगुले हे तेथे आले.

त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये एका बहिणीने हॉलमध्ये तर दुसरीने बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. आर्थिक अडचणीतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments