R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी भाजपा नेत्या चित्र वाघ यांच्या विरोधात दाखल केली...

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी भाजपा नेत्या चित्र वाघ यांच्या विरोधात दाखल केली तक्रार !

 

भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड येथील पॉकीचे स्थानकात राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातील वृत्ताला स्वत: चित्रा वाघ यांनीही ट्विटवरुन व्हिडिओ शेअर करत दुजोरा दिला आहे.

मात्र, महिलांवरील अत्याचाराविरोधात बोलल्यामुळे माझ्यावर गुन्हा नोंद होत असेल तर, असे १०० गुन्हे झाले तरी चालतील, असेही त्यांनी म्हटलंय. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलायं महिलाअत्याचार करणार्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा
पण मी बोलत रहाणार.. लडेंगे.. जितेंगे असे ट्विट त्यांनी केले आहे,

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबादमधील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलीस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला होता. तसेच, १८ जुलै रोजी बीड दौऱ्यावर असतानाही मेहबुब शेख यांच्यावरील आरोपाचा पुनर्उच्चार केला होता. त्यावरुन, शेख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गुन्हा नोंद झाल्याचे समजते.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments