R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुण्यातील निर्बंधांच्या मुद्द्यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आघाडीला लगावला टोला !

पुण्यातील निर्बंधांच्या मुद्द्यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आघाडीला लगावला टोला !

पुणे | कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. येत्यासोमवार पासून राज्यातील काही जिल्यांमध्ये कोरोना निर्बंधांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

मात्र निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. यावरुन आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या नियमानुसार २५ जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी ३ पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईचे नाव आहे पण पुण्याचे नाही. यावरुन मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये दुजाभाव का? असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच, पुण्याबाबत पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोना निर्बंधांवरुन पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारनं पुण्यातले निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध हटवण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातले निर्बंधही हटवले जातील, अशी या व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. आता राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यान्निपाठिंबा दर्शवला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments