R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या टीकेला केशव उपाध्ये यांचे सडेतोड उत्तर

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या टीकेला केशव उपाध्ये यांचे सडेतोड उत्तर

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाने २ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून पळ काढल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी ट्विट करून केली होती. या टिकेवरून भाजपने सुद्धा काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले होते. आता त्या पाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरुन काल हायकोर्टानं थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला अजून जाग आलेली नाही, असं प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

या संदर्भात आणखी एक ट्विट करून उपाध्ये म्हणतात की, धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही.

तसेच लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवतापण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याच्या ऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे असे ट्विट केले आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments