R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ भारत-पाकिस्तान येत्या २४ ऑक्टोबरला भिडणार; दुबईत रंगणार थरार !

भारत-पाकिस्तान येत्या २४ ऑक्टोबरला भिडणार; दुबईत रंगणार थरार !

 

क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असते. आता दीर्घ कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही लीग सुरू झाल्यानंतर काही काहीच दिवसात भारत-पाकिस्तान यांच्या सामना रंगणार आहे.

मागच्या काही कालावधीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून द्विपक्षीय सामने खेळवले गेले नाही आहेत. पण आता टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत-पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

ही स्पर्धा यावर्षी भारतात होणार होती, मात्र भारतातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या लीगमधील सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये होणार आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीने केलेल्या टी-२० वर्ल्ड कप ग्रुपच्या घोषणेनुसार, ब गटात भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची...

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

  मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments