R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यासाठी साडेचार कोटींच्या खर्चाला मान्यता !

नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यासाठी साडेचार कोटींच्या खर्चाला मान्यता !

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नदीपात्रातील भराव काढण्याच्या निवेदनाला आता घाईघाईने परवानगी देण्यात येत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्याक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यात येणार आहे.

भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी ३७ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील एकूण लांबी २४.३४ किलोमीटर तसेच इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. नदीच्या पात्रालगतच्या भागात अनधिकृत भराव टाकण्यात आले आहेत.

ह क्षेत्रीय कार्याक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यासाठी महापालिकेने २ जानेवारी २०२१ रोजी निविदा प्रसिद्ध केली. रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेसह ६ कोटी ५० लाख २९ हजार ६९३ रुपयांची निविदा मागविली होती. त्यामध्ये पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments