R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे पालिका उपायुक्तांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल, महिला पत्रकाराचा समावेश

ठाणे पालिका उपायुक्तांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल, महिला पत्रकाराचा समावेश

 

ठाणे | ठाणे पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेचे बाळकुम येथे ग्लोबल कोविड रुग्णालय असून पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर मागील वर्षभरापासून रुग्णालयाचा कारभार सांभाळत होते. यादरम्यान एका महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मात्र ही तक्रार खोटी असल्याचे सांगत संबंधित महिला, बिनु वर्गिस आणि नाझीया सय्यद या तिघांविरोधात केळकर यांनी खंडणीची तक्रार दाखल केली आहे. या तिघांनी माझ्याकडून तीन लाख रुपये उकळले, असे केळकर यांचे म्हणणे आहे. गेल्याच आठवडय़ात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बिनु वर्गिस याचे नाव असून नाझीया सय्यद ही महिला एका इंग्रजी वृत्तपत्राची माजी पत्रकार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments