R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा"

“संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा”

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दौरा केला होता. आता याच मुद्द्यावरून आमदार रवी राणा यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज विदर्भात देखील पाऊस वाढला आणि पावसाने विदर्भातील जनजीवन विस्कळीत केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरे सुरू केले. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. पण मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला नाही. त्यावरून आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुसळधार पावसामुळे विदर्भाचं मोठं नुकसान झालं. अमरावतीत देखील पावसामुळे अनेकांची घरे पडली. शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतकरी वाहून गेले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला नाही, अशी खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात घेऊन या, असं आव्हान देखील त्यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments