R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पेगॅसस प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले !

पेगॅसस प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले !

 

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १५ दिवस पुर्ण होत असले तरी देखील संसदेचं कामकाज अद्याप पूर्णपणे सुरु झालेले नाही आहे. पेगॅससच्या मुद्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ९ याचिकांवर सुनावणी करण्यात आली.

या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून केंद्राला फटकारले आहे. पेगॅसस प्रकरण करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत, यात काही शंकाच नाही. या प्रकरणातील सत्य समोर यायला हवं. या प्रकरणात कोणाचे फोन टॅप केले गेले आहेत, याविषयी आपल्याला माहिती नाही, असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी म्हटलं आहे.

व्यक्तिगतपणे जे या प्रकरणात पिडित आहेत. त्यांनी याविषयी याचिका का दाखल केली नाही?, असा सवाल खंडपीठानं उपस्थित केला आहे. तर हे प्रकरण जर २०१९चं आहे तर यावर आताच का याचिका दाखल केल्या गेल्या?, असाही सवाल न्यायालयाने विचारला आहे. २०१९ मध्ये कोणत्या व्यक्तींची हेरगिरी सुरू आहे याची माहिती समोर आली नव्हती. पण आता २०२१ मध्ये नावं समोर आल्यानं याचिका दाखल केल्याचं वकिल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं होत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments