R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मनसे आमदार राजू पाटील यांना शिवसेनेने दिला इशारा, पुन्हा असे घडले तर...

मनसे आमदार राजू पाटील यांना शिवसेनेने दिला इशारा, पुन्हा असे घडले तर पोलिसात रीतसर करणार तक्रार

 

आल्यानं डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता श्रेयवादावरून शिवसेना आणि मनसे समोरासमोर आली आहे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करुन मंजूरी दिली आहे.

मात्र दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी सोशल मिडियावर पत्र फिरविले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून स्वत:च्याच नावाचा उल्लेख असलेले पत्र फिरविले आहे. मनसे आमदाराला शिवसेना आता केवळ इशारा देत आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करुन कारवाई करण्याचा सज्जड दम शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिला आहे.

मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी उपरोक्त इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह सदानंद थरवळ, एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी उपस्थित होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments