R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काही दिवसांत लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल - मुख्यमंत्री

काही दिवसांत लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल – मुख्यमंत्री

 

मुंबई | लोकल आणि हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात पुढील दोन ते पाच दिवसात निर्णय होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इलेक्ट्रिक बसेसंच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलून दाखविले होते. कोरोना उलटणार नाही याची खबरदारी घेतोय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लाखो मुंबईकरांना आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसेसंचं लोकार्पण करताना लोकलसंदर्भात भाष्य केलं आहे.

एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करत आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली आहे. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. आपण हे सर्व काही करणार आहोत फक्त पुरेशी काळजी घेऊन, कोरोना उलटणार तर नाही ना हेही आपणास पहावं लागणार आहे.

लोकल आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा निर्णय आपण घेणार आहोत. तज्ज्ञांशी बोलतोय, तसंच महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलतोय. त्यानंतर दोन-पाच दिवसात कधी काय सुरु करणार याच्या सूचना दिल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments