R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते" काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका !

“…म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते” काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका !

 

मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी विविध मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी तील मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात.

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यामांसमोर येत नाहीत. कारण ते पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात, अशी टीका यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमी महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने दोन फोटो ट्विट केले असून, पहिल्या फोटोमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी दिसत आहेत.

या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले असून, दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये, असे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या फोटोत काहीच दिसत नसून, केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments