R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

 

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थाशन उडवून देण्यासाठी आलेला निनावी कॉल प्रकरण ताजे असताना आता मुंबई पोलिसांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा फोन करून मुंबईमधील प्रमुख तीन रेल्वे स्टेशन आणि बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. ही माहिती मिळताच सगळीकडे मुंबई पोलिसांकडून बॉम्बची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तिने फोन करून दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिली. त्या बॉम्बची तपासणी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, दहशतवादविरोधी पथक, रेल्वे पोलीस, बॉम्ब शोधक आणि विल्हेवाट पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी शोध तपासणी सुरू केली परंतु मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांची तपासणी करण्यात आली. मात्र त्या जागी काहीही संशयास्पद आढळलं नसल्यानं तो फोन खोटा आणि अफवा पसरवण्यासाठी होता. या अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबई पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तिच्या लोकेशनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments