R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो; आपलं बुवा रामदेव बाबांसारखं नाही"

“जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो; आपलं बुवा रामदेव बाबांसारखं नाही”

 

राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ OBC आरक्षणाचा मुद्धा सुद्धा तापताना दिसून येत आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने संभाजीनगरमध्ये नुकतंच ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या कार्यक्रमात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला खडेबोल सुनावले होते.

‘रामदेव बाबा जेवढ्या गाई नाहीत, त्यापेक्षा अधिक तूप विकत आहेत. तर जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहून अधिक मध विकत आहे. पण आपलं तसं नाही, जेवढ्या गाई आहेत, तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच तूप विकतो’ अशा शब्दात वड्डेटीवार यांनी रामदेव बाबाला टोला लगावला आहे. ते संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या OBC मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी इंपेरिकल डेटावरून भाजप पक्षावरही निशाना साधला आहे.

इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं होतं. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं. पण केंद्राकडून इंपेरिकल डेटा देण्यात आला नाही. ओबीसींच्या हक्काच्या ४० हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी यावेळी दिला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments