R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे. भालाफेकीसाठी नीरजच्या मन आणि मनगटात विश्वासाची, समर्थ साथ यांची ताकद भारणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसह, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रा याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

दरम्यान टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतील ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे.

आज कोट्यवधी देशवासियांची मने जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीने ऑलिंपिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे. देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. नीरज चोप्राचे मन:पूर्वक अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments