R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोदी सरकारला त्यांच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त आहेत...

मोदी सरकारला त्यांच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त आहेत – पी चिदंबरम

 

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोदी विरुद्ध काँग्रेस असा वाद चांगलाच पेटला आहे. अशातच आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी.चिदंबरंम यांनी न्यायाधिशांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची पदे गेल्या कित्येक दिवसांपासून रिक्त आहेत. याच मुद्यावरुन पी.चिदंबरंम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवे आहेत, असा टोला पी.चिदंबरंम यांनी लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

पी.चिदंबरम म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या १०८० पदांपैकी ४१६ पदे रिक्त आहेत. न्यायाधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. सध्या अनेक न्यायाधिकरणांच्या अध्यक्षांची पदे रिक्त आहेत. सात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार या जागा भरण्यासाठी सक्षम किंवा इच्छुक नाही.

 

तसेच या जागेसाठी देशात योग्य वकिलांची आणि न्यायाधिशांची कमी नाही. मात्र, खरे कारण हे आहे की, सरकार अशा लोकांच्या शोधात आहे जे त्याच्या प्रतिगामी तत्वज्ञान आणि विचारधारेबद्दल सहानभूती दाखवतील, असं देखील चिदंबरंम यांनी म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments