R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेत्री अलका कुबल शरद पवारांच्या भेटीला, बारामती येथील निवासस्थानी घेतली भेट

अभिनेत्री अलका कुबल शरद पवारांच्या भेटीला, बारामती येथील निवासस्थानी घेतली भेट

 

बारामती | अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या “गोविंदबाग” या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरही उपस्थित होते.

मागच्या कोरोना संसर्गाच्या काळात “आई माझी काळूबाई” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.

अलका कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे, असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments