R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आज पुण्यात मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक होणार !

आज पुण्यात मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक होणार !

 

पुणे | आज पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार असून या महत्वपूर्ण बैठकीकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचे असणारे १०२ घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकार मार्फत आज लोकसभेत येणार आहे.

तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजीराजे राज्यातील समन्वयक, अभ्यासक यांच्यासोबत पुणे येथील महालक्ष्मी लान्स राजाराम महाराज ब्रीज येथे राज्यस्तरीय व्यापक बैठक घेत आहेत. प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीराजे यांना महिन्यात इतर मागण्या सोडवू असे सांगितलं होतं.

मात्र अद्याप मागण्या सोडवल्या नसून आज ठाकरे सरकारनं दिलेल्या आश्वासनाला आज दोन महिने होत आले. फक्त आश्वासनामुळे मराठा समाज नाराज असल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील आंदोलनाचा मार्ग आज ठरणार आहे. १०२ घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण लढा नक्की कसा असावा याविषयी तज्ज्ञांशी चर्चा करून आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती मांडण्यात येणार आहे.

पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. मागण्या आणि सध्याची स्थिती युती सरकार आणि महाविकास आघाडी यांनी राबवलेली आणि दिलेली आश्वासनांचा पूर्ण व्हिडिओ तयार करून मांडली जाणार आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments