R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असताना याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून मराठा आरक्षण मुद्यावर संसदेच्या अधिवेशनात विषय मांडणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी पक्ष संघटना वाढी संदर्भात चर्चा केली असून दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत मराठा अधिवेशनावर चर्चा करणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. या आरक्षणाबाबत घटनात्मक दृष्ट्या कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत. वास्तविक पाहता मराठा आरक्षणाबाबत घटनादुरुस्ती करताना जो पर्यंत ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार काही करु शकणार नाही,असे राऊत यांनी म्हटले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments