R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू..; शिवसेनेच्या या खासदाराचे खळबळजनक विधान !

राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू..; शिवसेनेच्या या खासदाराचे खळबळजनक विधान !

 

राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाला दूर सारत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र विविध मुद्द्यावरून या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात अनेकवेळा दिसून आले होते. त्यातच आता शिवसेनेच्या खासदार संजय जाधव यांनी थेट राष्ट्रवादी बुडवण्याचे विधान केले आहे.

जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला.

आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचं आहे कुठं पर्यंत सहन करायचं आहे, असं संजय जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर ३१ जुलैला आंचल गोयल या पदभार स्वीकारतील हे अपेक्षित होते. पदभार स्वीकारण्यासाठी त्या दोन दिवस आधी येथे आल्या. मात्र अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला. गोयल यांना परत जावे लागले. या सर्व प्रकाराची माध्यमांनी दखल घेतली. समाजमाध्यमावरही लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

  मुंबई | कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश...

‘निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटले, खायला मटन मासे पुरवले’; शिवसेना आमदाराचा खुलासा

  सध्या राज्यात सव्हिसेना प्रणित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असताना दुसरीकडे मात्र शिवसेना नेते आणि आमदार,खासदार ईडी कारवाई आणि वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आलेले...

हिंदू राष्ट्राच्या मजबुतीसाठी राज ठाकरें लवकरच करणार अयोध्या दौरा

  शिवसेना पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments