R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचिका करु की आंदोलन? मनसेचा टोला !

तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचिका करु की आंदोलन? मनसेचा टोला !

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना लोकल प्रवास संदर्भात मोठी घोषणा केली. लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचं मनसेने स्वागत केलं आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी यासाठी मनसेने आंदोलन केलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल बोलताना लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून काम करत नसल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. यावरुन संदीप देशपांडे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

“आंदोलन, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन, आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा,” असा उपहासात्मक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments