R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश तर राष्ट्रवादीलाही आम्ही पाया खाली घालू, शिवसेना खासदाराचं जाहीर सभेत वक्तव्य !

तर राष्ट्रवादीलाही आम्ही पाया खाली घालू, शिवसेना खासदाराचं जाहीर सभेत वक्तव्य !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तर या तीन पक्षाच्या आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसून आले आहे. त्यातच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे.

वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले होते.

पुढे ते म्हणाले की, माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती.

राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असं जाधव म्हणाले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments