R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी झोपेचं सोंग घेतंय - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी झोपेचं सोंग घेतंय – देवेंद्र फडणवीस

 

नवी दिल्ली | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे संसद भवनात अमित शहांना भेटले. या भेटीनंतर फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्य सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीए, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत योग्य माहितीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली जात नाहीए. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकार झोपेचं सोंग घेतंय. कुणालाही मागास घोषित केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही. पण महाराष्ट्रातील सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाहीए, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसेच गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांनी भाष्य केलं होत. राज्यांना आरक्षणाचे अधिकार देण्यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक मांडत आहे. विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा आणि ते मंजूर करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments