R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दानवेंच्या ‘या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंच जोरदार प्रतिउत्तर

दानवेंच्या ‘या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंच जोरदार प्रतिउत्तर

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुकच्या माध्यमातून लोकलसेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरू होणार आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं म्हटलं आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली दानवेंना टोला हाणला आहे.

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की, ही जबाबदारी घेणार कोण?, त्यामुळे आधीचे रेल्वेमंत्री होते त्यांनी जबाबदीराने काम केलं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी किडीच्या राज्यमंत्री दानवेंना टोला लगावला आहे. त्यासोबतच त्यांना मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी त्या केल्या असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना मंत्री ठाकरे म्हणाले की, “आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. रेल्वेने आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. श्रेयवादात न पडता लोकांसाठी काम करायचे आहे. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांनी ते घ्यावे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांना गैरसोय होऊ नये आणि लोकांचे प्राण गमावले जाऊ नयेत.

दरम्यान, या संदर्भात आज टास्क फोर्ससोबत चर्चा होणार आहे. काही देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे १५-१५ दिवसांच्या टप्प्यांनी निर्बंध शिथिल केले जाईल. १५ तारखेपासून दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवास करता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments