R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मग...

पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मग बघून घेतो – महादेव जानकर

पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात मुंडे भगिनींना डावलण्यात आले होते. यावरून माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षावर आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती मात्र दिल्लीवारी करून आल्यानंतर त्यांचा सूर बदलला होता. त्यातच आता पुन्हा महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिला आहे. जानकर आज औरंगाबादेत बोलत होते. पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं मग बघू, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला आहे.

त्याचबरोबर मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असं मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. एमपीएससी बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगर, वंजारी यांना नेहमीच डावल्याचा प्रयत्न केला जातो. या विषयी एमपीएससीनं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments