R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन गोकुळची ‘बासुंदी’ ग्राहकांच्‍या सेवेत लवकरच रुजू होणार .....

गोकुळची ‘बासुंदी’ ग्राहकांच्‍या सेवेत लवकरच रुजू होणार …..

 

मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने श्रावण सोमवारच्या शुभमुहूर्तावर आणखीन एक नवीन उत्पादन घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दुग्धजन्य पदार्थामध्ये आणखीन एका नव्या रूपामध्ये म्हणजे गोकुळ बासुंदी विक्रीसाठी लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. त्‍याची आज दिनांक ०९.०८.२०२१ रोजी श्रावण सोमवारच्या शुभदिनी गोकुळ प्रकल्प येथे मा.चेअरमन श्री.विश्वास पाटील शुभहस्ते व इतर मान्यवर संचालक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत लॉंचिंग झाले.

सध्‍या बाजारामध्‍ये गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची विक्री कोल्‍हापूर, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग, रत्‍नागिरी, सांगली, बेळगांव, गोवा या ठिकाणी दररोज अंदाजे १३ लाख लिटर्स पर्यंत केली जात आहे. गोकुळच्‍या गुणवत्‍तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्‍वास असल्‍याने गोकुळ दूधाबरोबर गोकुळचे दुग्‍धजन्‍य पदार्थ तूप, श्रीखंड, टेबल बटर, कुकींग बटर, पनीर, लस्‍सी, दही, ताक, टेट्रा पॅक दूध या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

गेल्या काही काळापासून ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन संघाने “गोकुळ बासुंदी” उत्पादन घेऊन विक्रीसाठी उपलब्ध करून देणेचा निर्णय संचालक मंडळाने नुकताच घेतला होता. याची अंमलबजावणी म्हणून गोकुळच्या बासुंदीचे लॉंचिंग आज करण्यात आले. सुरवातीच्या काळात बासुंदी २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम अशा आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध केली आहे तसेच अंजीर,सीताफळ, बटरस्कॉच व इतर सर्व फ्लेवर मध्ये लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांच्या मागणीनुसार भविष्यात १ किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देणेचे नियोजन केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस सुरु असलेने ग्राहकांना गोकुळच्या बासुंदीची चव निश्चितच आवडेल सदरची बासुंदी वितरकांबरोबरच मोठ्या शहरांमधील मुख्य मॉलमध्ये उपलब्ध करून देणेत येणार आहे.बासुंदी उत्पादनामुळे संघाकडे अतिरिक्त ठरणाऱ्या दूधाची काही प्रमाणात निर्गत लावणे शक्य होणार असल्याचे संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी प्रतिपादन केले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments