R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्यात येत आहे

 

मुंबई | ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

थोरात म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, याच मैदानातून १९४२ साली जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला गेला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments