R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति कपिल सिब्बल यांच्या घरी विरोधकांची बैठक, शरद पवार होते उपस्थित

कपिल सिब्बल यांच्या घरी विरोधकांची बैठक, शरद पवार होते उपस्थित

 

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी दिल्लीमधील आपल्या घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन केले होते. कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त हे डिनरचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र असे असले तरी यावेळी चर्चा मोदी सरकारविरोधात सुरु होती.

गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडले तरच पक्ष मजबूत करणे शक्य असल्याचेही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यावेळी गांधी कुटुंब उपस्थित नव्हते. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाची घसरण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता.

काँग्रेस नेत्यांच्या या धाडसी पत्रामुळे त्यावेळी खळबळ माजली होती. या पत्रात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी करत नेतृत्वासंबंधीही मत व्यक्त करण्यात आलं होतं. आमंत्रितांमध्ये पी चिदंबरम, शशी थरुर आणि आनंद शर्मा यांचाही समावेश होता. या तिघांनाही पक्षाच्या भवितव्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.

डिनर पार्टीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला उपस्थित होते.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments