R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांशी बोलणे केल्याने चर्चेला...

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांशी बोलणे केल्याने चर्चेला आजची वेळ

 

लाँकडाऊन मुळे अडचणी आलेल्या मराठी कलावंतांनी ठाकरे सरकार विरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले.
आम्हाला आमचे म्हणणे सरकार पुढे मांडू द्या, अशी विनंती हे कलावंत सरकारकडे करीत होते. पण सरकार कडून चर्चेला वेळ मिळत नव्हती. अखेर या कलाकारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन. ठिय्या मांडला.

याबाबतची वृत्त समजताच भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोबत स्थानिक आमदार कालिदास कोळबंकर ही होते. त्यांनी अभिनेते विजय पाटकर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

आम्हाला आमचे म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे. किमान आमचे ऐकून घेण्यासाठी वेळ तरी घ्या, अशी विनंती हे कलावंत करीत होते, पण सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जोपर्यंत वेळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कलावंतांनी घेतला होता.

त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी तातडीने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व आज दुपारी १२:३० वाजता मंत्रालय चर्चेसाठीची वेळ मिळवून दिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments