R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच वापरला आमदार निधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच वापरला आमदार निधी

 

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक आमदारांचा निधी रोखण्यात आला होता. मात्र आता हळु-हळु परिस्थिती सुधारत असल्यामुळे आमदार निधीचे वाटप करण्यात येत आहे.दरवर्षी विकासकामांसाठी आमदारांना निधी दिला जातो. हा निधी मतदारसंघातील कामांसाठी वापरण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार असल्याने त्यांचा आमदार निधी कुठल्याही मतदारसंघात वापरला जाऊ शकतो.

आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील शिवाजी पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या पार्कला शिवतीर्थ म्हणून संबोधत असतं. १९६६ मध्ये याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती.

शिवतीर्थापासून हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मैदानाच्या शुशोभिकरणासाठी जिल्हा स्थानिक विकास योजनेतून निधी दिला आहे. याबाबत १९ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना पत्र पाठवलं होतं.

या पत्रात म्हटलं होतं की, शिवाजी पार्क परिसरातील फुटपाथचा वापर अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू करत असतात. परंतु याठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीत नसून त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि शुशोभिकरणासाठी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments