R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ ऑलिंपिक उपांत्य सामन्यात रवी दहियाचा चावा घेणाऱ्या कुस्तीपटूने मागितली माफी !

ऑलिंपिक उपांत्य सामन्यात रवी दहियाचा चावा घेणाऱ्या कुस्तीपटूने मागितली माफी !

 

टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये कुस्ती या खेळात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्य पदक जिंकले आहे. दरम्यान उपांत्य सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी असलेला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरिस्लाम सनायेवने त्याच्या दंडाला चावा घेतला होता. मात्र संधी मिळताच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सनायेव रवीची माफी मागितली होती. रवीने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. त्याने ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे.

रवी म्हणाला की, ‘दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आमचे वजन करायला गेलो होतो; तेव्हा सनायेव माझ्याआधीच तिथे आला होता. त्याने माझ्याकडे येऊन हातात हात मिळवला. मीही त्याला नमस्कार केला. कारण मी सर्व काही विसरलो होतो.

त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला की, मला माफ कर भाऊ. मी चुकलो. यावर मी हसून त्याला पुन्हा मिठी मारली. त्याक्षणी आमच्यात चांगली मैत्री जुळली. आम्ही इतर मुद्द्यांवरही विनोद केला.’ सनायेवच्या कृतीवर पुढे बोलताना रवी म्हणाला की, ‘कुस्तीमध्ये लोक मारामारीपर्यंत उतरतात, ही छोटीशी बाब आहे. कोणीतरी मला चावले आहे हे मी मॅटवरच विसरून गेलो होतो. मला वेदना होत राहिल्या. पण मला चावणाऱ्या कझाकिस्तानच्या कुस्तीपटूवर मला कधी राग आला नाही.’

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची...

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

  मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments