R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका !

संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका !

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर व ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यापासून राणे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका सुरू केली आहे.

यातच आता माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत, हा टाइमपास कशाला, अशी विचारणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. यावरून निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राणे आपल्या ट्विटमध्य म्हणतात की, सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये 377 अंतर्गत एम्पिरिकल डेटा (OBC) केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. ३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग ह्या आयुदा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला? असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

Recent Comments