R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दिल्लीत चार दिवस राहूनही अमित शाहांची भेट नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात की

दिल्लीत चार दिवस राहूनही अमित शाहांची भेट नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात की

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौर्यानंतर मुंबई पत्रकार मद्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले आहे. तसेच सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

“काल रात्री रावसाहेब दानवेंकडे जेवण झालं. अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झाल्या. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अतिशय रुटीन प्रवास होता, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मी आमचं वारंवार दिल्लीला जाणं होतं, आमचा सातत्याने प्रयत्न असतो, नेक्स्ट जनरेशन उभं केलं पाहिजे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, बावनकुळे, श्रीकांत भारती असा ग्रुप घेऊन नवीन मंत्री झालल्या भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन करणं त्यांची खाती समजून घेणं, असा हा कार्यक्रम होता. साधारण कोव्हिडच्या आधी दरवर्षी खासदारांना जेवण देणं आणि महाराष्ट्रातील मुद्दे सांगणे हे होत होतं. गेल्या दोन वर्षात ते झालं नव्हतं.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments