R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की 'वर्क फ्रॉम होम' ?

दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की ‘वर्क फ्रॉम होम’ ?

मागच्या अनेक दिवसांपासुन सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर भारतीय जनता पक्ष तसेच सामान्य नागरिकांचा रेटा सुरू होता. यानंतर ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टनंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देत असल्याचा निर्णय जाहीर केला.

मात्र, लोकल प्रवासासाठी काही अटी सरकारने ठेवल्या आहेत, त्या पूर्ण केल्यानंतर लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र, ठाकरे सरकारने लोकल प्रवाससचा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार का, अशी विचारणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी सरकार नमले. भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, अशी टीका केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, दोन डोस झालेला सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करेल पण दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम अशी टीका केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments