R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते? जेव्हा राऊत यांच्या...

वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते? जेव्हा राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेबद्दल भाजप नेते म्हणतात की,

 

शिवसेना नेते आणि खास संजय राऊत रोज पाटकर परिषदे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बेछुड आरोप करतात असताना तर काही सामना अग्रलेखातून भाजपच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत असतात. त्यातच खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा हा भाजप नेत्यांसाठीही चर्चेचा विषय बनल्याचं दिसतं आहे.

“वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते?” असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यानं राज्यातल्या नेत्यांना केल्याचं समजतं. संजय राऊत यांच्या रोजच्या हल्ल्यांना तितकंच जोरदार प्रत्युत्तर द्या असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना दिल्लीतून सांगितलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी संघटन महामंत्री बी एल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीत संघटन, आगामी निवडणुका याबाबतची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे जवळपास रोज माध्यमांतून आपली भूमिका मांडत असतात. कधी महाविकास आघाडीवर होणा-या आरोपांचं समर्थन, तर कधी केंद्रावर हल्लाबोल, विरोधकांना चिमटे. काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपकडून तातडीनं प्रत्युत्तर येतंही, पण सतत देण्याची आवश्यकता भाजपला वाटत नाही. पण मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असल्यानंही जोरदार प्रत्युत्तरावर भर देण्याची आवश्यकता भाजपच्या दिल्ली नेत्यांना वाटत आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments