R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति इतर मागासवर्गीयांचे प्रश्‍न तातडीने सोडवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

इतर मागासवर्गीयांचे प्रश्‍न तातडीने सोडवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 

इतर मागासवर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्य शासन वचनबद्ध असून, त्यांच्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तत्काळ कार्यवाही करून, अहवाल देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आणि केंद्र सरकारकडील इम्पेरिकल डाटा राज्याला द्यावा अशी आग्रही मागणी केल्याचेही सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळ यांच्यासाठी आवश्‍यकतेनुसार प्राधान्यक्रमाने निधी दिला जाईल. महाज्योती संस्थेची उपकेंद्रे राज्यातील विभागीय ठिकाणी सुरू करणे, महाज्योतीला स्वतंत्र कर्मचारी-अधिकारी नेमणे संदर्भात त्वरित कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळाने राज्याची तमिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात इम्पेरिकल डाटाची मागणी केंद्राकडे करण्यात आली असून, सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनाच्या माध्यमातून देखील या प्रश्‍नी राज्याची बाजू मांडण्यात येत आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments