R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघाला पूराचा फटका, मदतीला कोणीही न आल्यामुळे गावकरी संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघाला पूराचा फटका, मदतीला कोणीही न आल्यामुळे गावकरी संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीत पूराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणी अनेक गावांमध्ये ओयरचे पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पूराच्या तडाख्यातून वाराणसीतील गावंही बुडाली आहे.

या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. वाराणसीतील रमना गावात तर निम्मे गाव जलमय झालं आहे. अनेक शेती गंगा नदीच्या पाण्याखाली आली आहे. बोटीच्या माध्यमातून लोकांना वाचवलं जात आहे. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानं २०२२ मध्ये विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा गावकरी देत आहेत.

गावांना जोडणारे मार्ग पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटला आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरामुळे रमना गावातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. ४० हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १५ हजाराहून जास्त मतदार आहेत. गावातील ७० टक्के लोकसंख्या भाजीपाल्याच्या शेतीवर निर्भर आहेत. गंगा नदीला पूर आल्याने अर्ध्याहून जास्त शेती पाण्यात गेली आहे.

जेव्हा पूरामुळे गावकरी अडचणीत आले आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र याठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकार ब्रिटिशाप्रमाणे वागतं. नुकसान भरपाई म्हणून २००, २५० ते ५०० रुपये काही शेतकऱ्यांना मिळतात. नदीकिनारी संरक्षक भिंत बनवल्यास पूराचं पाणी रोखता येऊ शकतं. यासाठी अनेकदा सर्वेक्षण झालं आहे. परंतु ते केले जात नाही असा आरोप गावकऱ्यांनी लगावला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments