R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'आईचा पहिला विमान प्रवास' खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा लाइक्स'चा...

‘आईचा पहिला विमान प्रवास’ खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा लाइक्स’चा वर्षाव

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ते अनेकवेळा आपले परखड मत सोशल मीडियाच्या माद्यमातून मांडताना अनेकदा दिसून आले आहेत. मात्र आता अमोल कोल्हेंच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वचं लक्ष वेधले आहे.

‘आईचा पहिला विमान प्रवास’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली असून त्यासोबत विमानतळावरील काही फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केले आहेत. आईचा पहिला विमान प्रवास हा त्यांच्यासाठीसुद्धा का खास आहे, याबद्दल त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘आईचा पहिला विमान प्रवास! अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु सासर-माहेर एकाच गावात, नातेवाईकसुद्धा जवळपासच्या गावात किंवा शहरात त्यामुळे विमानप्रवासाची कधी वेळंच आली नाही. बरं, आधी वडिलांची शेती, मुलांच्या (आमच्या) परीक्षा या सगळ्या प्रापंचिक व्यापातून खास विमानाने फिरायला जाणं ही आम्हा मध्यमवर्गासाठी चैनच! आज तिच्यापेक्षा आम्हीच जास्त उत्साही होतो. जिने हातांच्या हिंदोळ्यावर झुलवलं, कागदाचं विमान करायला शिकवलं इतकंच नाही तर भरारीचं स्वप्न डोळ्यांत पेरलं, तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा आनंद शब्दांत न सांगता येणारा,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments